Top 5 Gadget in 2025 | २०२५ मधले टॉप ५ भन्नाट गॅझेट्स –टेक्नॉलॉजीच्या दुनियेतली धमाल!

admin
2 Min Read
Top 5 Gadget in 2025

Top 5 Gadget in 2025: तंत्रज्ञानाची गाडी दिवसेंदिवस भन्नाट वेगाने धावत चाललीय. दरवर्षी काही तरी नवं, वेगळं आणि “वा!” वाटावं असं गॅझेट बाजारात येतं. २०२५ही काही वेगळं नाही! चला तर मग, पाहूया यंदाच्या वर्षात कोणते गॅझेट्स चर्चेत आहेत आणि सामान्य माणसाच्या वापरातही उपयोगी पडणार आहेत.


📌Top 5 Gadget in 2025: Apple चं ‘Vision Pro’ – आता डोळेच होतील तुमचं माऊस!

Apple ने पहिल्यांदाच AR हेडसेट आणलं आहे – आणि खरं सांगायचं तर, हे गॅझेट पाहून “भन्नाटच आहे!” असंच वाटतं. यामध्ये खास चिप आहे, डोळ्यांची हालचाल ओळखणारी टेक्नॉलॉजी आहे, आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव इतका रिअल आहे की, आपण कुठे आहोत हेच विसरायला होतं.


📌 २. Samsung Galaxy Z Fold 5 – फोल्ड होणारा फ्युचर फोन

Samsung चा Fold 5 हा फोन म्हणजे खिशात लॅपटॉप ठेवल्यासारखा वाटतो. स्क्रीन मोठा आहे, पण फोल्ड झाल्यावर अगदी स्लीम दिसतो. यामध्ये गेम खेळणं, मल्टीटास्किंग करणं, ऑफिसचं काम करणं – सगळं सहज शक्य आहे.


📌 ३. Lenovo ThinkBook Plus Rollable – स्क्रीन वाढतो… होय, खरंच वाढतो!

हो अगदी खरं! हा लॅपटॉप रोल करून त्याचा स्क्रीन मोठा करता येतो. म्हणजे १४ इंचाचा लॅपटॉप सहज १७ इंचापर्यंत वाढतो. थोडक्यात, कॉम्पॅक्टपणा आणि मोठी स्क्रीन दोन्ही एकत्र!


📌 ४. Roborock Saros Z70 – घरातील रोबोट बायको!

साफसफाई करणारा हा स्मार्ट रोबोट म्हणजे अगदी आपला मदतीला आलेला “स्वयंचलित नोकर”! व्हॅक्युमिंग, मॉपिंग, कोपऱ्यांमध्ये जाऊन स्वच्छता – सगळं एकाच मशीनमध्ये. मोबाईलवरून कंट्रोल करता येतो आणि कामही एकदम हुशारपणे करतो.


📌 ५. Withings Omnia – आरशात आरोग्य बघा!

स्मार्ट मिरर असं एकतंय पहिल्यांदाच? हे आरशात बघताना तुमचं वजन, हृदयाचे ठोके, झोपेची पद्धत आणि मेटाबॉलिक माहिती मिळते. घरबसल्या आरोग्य तपासणी!


💸 स्वस्तात मस्त गॅझेट्स – बजेटनं दिली टेकप्रेमींना खूशखबर!

सरकारने नवीन बजेटमध्ये काही गॅझेट्सवर इम्पोर्ट ड्युटी कमी केलीये. म्हणजे स्मार्टफोन, टीव्ही आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार – म्हणजे “टेक्नॉलॉजी सर्वांसाठी” ही कल्पना अजून जवळ येतेय.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *